Posts

Showing posts from August, 2017

तू...

चंद्रपेक्षा जास्त सुंदर आहे तू, तू चंद्रसारखी नाही, चंद्र तुझ्या सारख आहे... गुलाबाच्या फुलांपेक्षा सुगंधी तु पहिल्या पावसाचा पहिला आनंद आहे तू सरीपेक्षाही मनावर मनसोक्त वाहणारी परी आहे तु.... स्वप्नात मागितलेली इच्छा आहे तू देवाने मला दिलेलं वरदान आहे तू आणि माझ्या ह्रदयात राहणारी फक्त आणि फक्त तु....

बरं वाटतं...

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं... ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं... कौतुक करणार कुणीतरी असेल तर, थकेपर्यत राबायला बर वाटतं... नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.... जीवनात तुमच्या सारखे मित्र असले तर, मरे पर्यंत तुमच्या सोबत जगायला बर वाटत....

मी कुठे म्हणालो परी मिळावी...

मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी... प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी... स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी... हवी हवीशी एक जखम एकदातरी उरी मिळावी... गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हासरी मिळावी.. चंद्राइतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी... मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी...